वनस्पतींच्या वाढीला आवश्यक असणारे अन्नद्रव्ये
1. कार्बन,
2. हायड्रोजन
3. ऑक्सिजन
प्रमुख अन्नद्रव्ये
4. नत्र
5. स्फुरद
6. पालाश
दुय्यम अन्नद्रव्ये
7. कॅल्शिअम
8. मॅग्नेशिअम
9. गंधक
सूक्ष्म अन्नद्रव्ये
10. लोह
11. मँगनीज
12. बोरॉन
13. झिंक
14. कॉपर
15. मॉलिबडिनम
16. क्लोरीन
17. निकेल
Deficiency Symptoms of Nutrients and Control Measures . अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व उपाय
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
झाडाची पाने पिवळी होतात. पाने वाळतात. मुळांची व झाडाची वाढ थांबते. नवीन फूट व फुले कमी येतात.
👉उपाय-
आवश्यकतेनुसार नत्रयुक्त रासायनिक खते (युरिया) व भरखते (कंपोस्ट, शेणखत इ.) द्यावीत
2) स्फुरद
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
पानांची मागील बाजू लाल, जांभळट होते. खालील बाजूची पाने वाळतात व शिरांमधील जागेत जांभळट दिसतात. पाने हिरबी लांबट होऊन वाढ खुंटते. फळे उशिरा पक्व होतात.
👉उपाय
गरजेनुसार स्फुरदयुक्त रासायनिक खते (सिंगल सुपर फॉस्फेट) व भरखते द्यावीत.
3. पालाश
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
पानांच्या कडा तांबडसर होऊन पानावरही तांबडे व पिवळे ठिपके येतात. पानांच्या कडा व शेंडे जळतात. पाने जाडसर होऊन सुकतात. खोड आखूड होते.
.
👉उपाय
पालाशयुक्त रासायनिक खते (म्युरेट ऑफ पोटॅश) राख व भरखते द्यावीत.
4 चुना
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
टोकाची कोवळी पाने व अग्रांकुर सुरकुतून जातो. फांद्या व शेंडे वाळतात. खोड टोकाकडून वाळते.
👉उपाय
जमिनीत मुक्त चुना पाण्याबरोबर द्यावा किंवा कॅल्शिअम कार्बोनेट जमिनीत मिसळून द्यावे.
Calcium deficiency in tomato
5. गंधक
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
पानांच्या शिरा फिकट हिरव्या दिसतात.
शेंड्याकडील नवीन पानांची वाढ खुंटते.
👉उपाय
पाण्यात विरघळणारे गंधक (80%) पानावर
फवारणी करावी.
6. मॅग्नेशिअम
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
प्रथम खालील बाजूच्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व नंतर टोकापर्यंत नवीन पानांपर्यंत जातो. पानांवर करपलेले ठिपके येतात व पाने गळतात.
👉उपाय
जमिनीत किंवा पानांवर फवारणीद्वारे मॅग्नेशिअम सल्फेट 0.5% द्यावे.
7. लोह
नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो तर शिरा हिरव्या राहतात. झाडांची वाढ खुंटते. संपूर्ण पाने फिकट पिवळी ते पांढरी दिसतात.
👉उपाय
0.5 ते 1 टक्के सल्फेट (हिराकसची) फवारणी करावी.
8. बोरॉन
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
झाडांचे शेंडे व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. पानावर सुरकुत्या पडून पिवळे चड्ढे पडतात. खोडावर भेगा पडतात. फळावर देखील तांबडट ठिपके पडून भेगा पडतात.
👉उपाय
0.5किलोग्रॅम बोरॅक्स 100 लीटर पाण्यातून किंवा जमिनीतून 5 किलो प्रति हेक्टरी द्यावे.
9. मँगनीज
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
पापानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होती व नंतर पांढरट व करडा होतो. संपूर्ण पान फिकट पिवळसर दिसते. पानांची वाढ कमी होऊन नंतर ते गळतात.
👉उपाय
8 ते 25 किलो मँगनीज सल्फेट प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे.
10. जस्त
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
शेंड्याकडील पाने लहान आकाराची व अरूद होतात. शिरांच्या आतील भाग पिवळा पडतो. पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात. बहार कमी येतो व फांद्या सुकतात.
👉उपाय
0.5 ते 1 किलो झिंक सल्फेट 100 लीटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा 2 ते 20 किलो जमिनीतून प्रति हेक्टरी द्यावे.
11. तांबे
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
झाडांच्या शेड्याची वाढ खुंटते. झाडांना 'डायबॅक' नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते. सालीच्या आत खोडावर डिक जमा होतो. पाने लगेच गळतात.
कॉपर सल्फेटची 0.4 ते 0.5 टक्के फवारणी करावी.
12. मॉलि-ब्डेनम
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. | पानांच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव श्रवतो.
👉उपाय
0.25 ते 0.5 किलो प्रति हेक्टरी सोडिअम मॉलिब्डेनम जमिनीत द्यावे.
13. क्लोरिन
👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे-
वनस्पतीची वाढ खुंटते. झाड मर रोगाला बळी पडते. झाडांची नत्र व गंधक शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
👉उपाय
0.2% क्लोरिन जमिनीत मिसळून द्यावे.
खतांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण
रासायनिक खतांचे नाव N : P : K
1) नत्रयुक्त खते
अमोनियम सल्फेट :- 20.6 : 0 : 0
अमोनियम क्लोराईड :- 25.5 : 0 : 0
अमोनियम सल्फेट नाइट्रेट:- 25.5 : 0 : 0
कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट:- 25.5 : 0 : 0
युरिया :-- 46 : 0 : 0
2)स्फुरदयुक्त खते
सिंगल सुपर फॉस्फेट 0 : 16.0 : 0
ट्रिपल सुपर फॉस्फेट 0 : 40 : 0
3) पालाश युक्त खते
म्युरेट ऑफ पोटॅश 0 : 0 : 60
सल्फेट ऑफ पोटॅश 0 : 0 : 48
4) संयुक्त खते
मोनो अमोनियम फॉस्फेट 10.0 : 48 : 0
डाय सल्फेट फॉस्फेट 18.0 : 46 0
अमोनियम फॉस्फेट सल्फेट 16.0 : 20 : 0
युरिया अमोनियम फॉस्फेट 28.0 : 29 : 0
नायट्रो फॉस्फेट ( सुफला) 20.0 : 20.0 : 0/
15 : 15 : 15
अमोनियम नायट्रो फॉस्फेट 18.0 : 18.0
सुक्ष्म खतातील अन्नद्रव्यांचे सरासरी प्रमाण
जस्त सल्फेट 22.5 (जस्त) + गंधक 15
फेरस सल्फेट 19.0 (लोह) + गंधक 19
मँगनीज सल्फेट 30.5 (मँगनीज) + गंधक 17
कॉपर सल्फेट 24.0 (तांबे) + गंधक 13
बोरॅक्स (सोडियम टेट्राबोरेंट) 10.5 ---------
अमोनियम मॉलिब्डेट 52.0 (मालेब्डेनम) ----
कृपया माहिती आवडल्यासइतरांनपर्यंत अवश्य पाठवा 🙏
आणि अशीच नव नवीन माहिती मिळविण्यासाठी वरिल येणाऱ्या नोटिफिकेशन्स बार वर सबस्क्रिप्शन चालू करा धन्यवाद
Comments
Post a Comment