Skip to main content

कांदा पिक प्रमुख रोग कीडी व ऊपाय ,Major Pests & Diseases of Onion

             🌰🌰कांदा पिक प्रमुख रोग ,कीडी व ऊपाय 

            



Onion  कांदा  2n=16

Botanical name: Allium cepa L.


 Family:  Alliaceae

Origin: Asia Minor

Plant part: Bulbs






महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावर  कांदा उत्पादनात अग्रेसर आहे गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या  बदलामुळे, अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण , धुके, मोठ्या प्रमाणात पाऊस  या कारणांमुळे या पिकात मोठ्या प्रमाणात कीड व रोग यांचा प्रादुर्भाव होत आहेत . खरीप हंगामात प्रामुख्याने रोपे कोलमडणे त्यालाच डम्पिंग ऑफ, पीळ पडणे , मर होणे, कांदा साठवणीत सडणे, काळया बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ, अशा अनेक  समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. आज आपण या रोगां मागील वैज्ञानिक कारण, तसेच उपाय योजना याबद्दल माहिती बघणार आहोत . 


👉👉   कांदा पिक प्रमुख रोग

1. मर रोग किंवा रोप कोलमडणे (Damping off)

  2. काळा करपा (Anthracnose) 
  3. पांढरीसड (White Rot)
  4. मुळकुज (Fusarium basal rot)
  5. जांभळा करपा (Purple blotch)
  6. कांद्यावरील तपकिरी करपा (Stemphylium blight)


  👉कांदा पिक प्रमुख किड
 फुलकिडे /थ्रीप्स

या किंडीचा  मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. व पिकांचे नुकसान होते.

                            ओळख
                        
         
       (Onion thrips) Thrips tabaci


) थ्रीप्स सुमारे 1 मिलीमीटर लांबीचा असतो, 
२)रंग पिवळा, तपकिरी असतो व त्याच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. 
३) किडींची मादी पानावर पांढऱ्या रंगाची 50 ते 60 अंडी घालते. 
४)अंडी घालण्याचे प्रमाण दिवसाला 4 ते 6 वेळा असते. पिलांचा जगण्याचा कालावधी 6 ते 7 दिवसांचा असतो.
५) ढगाळ व दमट हवामान  या कीडीच्या वा ढीसाठी  पोषक असते. 

🌟  नियंत्रण- 
जैविक नियंत्रण 
1)  नीम अर्काचा वापर केल्यास नुकसान कमी होते. 
2) मुख्य पिकाच्या कडेने सापळा पिकांची लागवड करावी. (मका) 
3) पिवळे ,निळे चिकट सापळे लावावे. 

रासायनिक नियंत्रण
Dimethoate 30 % EC @ 13 ml/10 ली पाणी  किंवा Lambda cyhalothrin 5% EC @ 10 ml/10 lit. पाणी या प्रमाने फवारणी करावी व 
जास्त   प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास 👉  एसीफेट (Acephate) किंवा  फिप्रोनिल (Fipronil) ची  फवारणी करावी 

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर
 क्लिक करा 👇

  👆👆 click here for more information

   👆👆👆👆एकदा आवश्यक बघा कांदा पिकातील फुलकिडे नियंत्रण 🙏🙏
      


    १) मर रोग किंवा रोप कोलमडणे   (Damping off)
बुरशी : स्क्लेरोशियम रॉलफ्सी (Sclerotium rolfsii) 


बी पेरल्यानंतर रोप उगवून येते. रोप वाढत असतानाच या बुरशीचे दाणे रोपांच्या जमिनीलगतच्या भागातून शिरकाव करतात. या रोगामुळे रोपाचे 90% पर्यंत नुकसान होते. लागवडीनंतर हा रोग कांद्याच्या शेतातदेखील मोठ्या प्रमाणात पसरतो.
 
👉लक्षणे : 
 
1. रोपे पिवळी पडतात.
2. जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात.
3. कोलमडलेल्या रोपांच्या जमिनीलगतच्या भागांवर पांढरी बुरशी वाढते व त्यावर बारीक पांढरे दाणे तयार होतात. थोड्याच दिवसांत हे मोहरीच्या दाण्याच्या आकाराचे बनतात.
4. हे दाणे जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहतात. पुढच्या वर्षी कांद्याची रोपवाटिका त्याच भागात केली तर मर रोगाची आणखी जोरात प्रादुर्भाव होतो.
 
👉रोगास प्रतिकूल वातावरण :
 
1. खरीप हंगामातील हवामान या रोगास अत्यंत उपयुक्त ठरते.
2. अधिक आद्रता व 24-300 सें. तापमान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते.
3. रोपवाटिकेच्या वाफ्यातून पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात झाला नाही तर रोगाची तीव्रता वाढते.
 
🌟उपाय : 
 
1. पेरणीपूर्वी बियांना डायथायोकार्बामेट किवा कार्बोक्सीन हे औषध 2-3 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे.
2. रोपे नेहमी गादीवाफ्यावर तयार करावीत. कारण गादीवाफ्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.
3. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
4. एवढे करून रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच तर दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन किवा कार्बोक्सीनचे द्रावण ओतावे. 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
 
https://youtu.be/Qb0M7EXrQzc
👆करपा  नियंत्रण  
 
2. काळा करपा (Anthracnose)
 
महाराष्ट्रात खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
बुरशी :कोलिटोट्रायकम ग्लेओस्पोराईडस (Colletotrichum Gloeosporoides)
 
👉लक्षणे :
 
1. सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढू लागतात.
2. ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने वाळतात.
3. एकापाठोपाठ पाने वाळत गेल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.
4. पानावरील चट्टे जवळून बघितल्यास काळ्या ठिपक्याचा मधला भाग पांढर्‍या रंगाचा असून त्याभोवती गोलाकार काळे पट्टे असल्याचे दिसते.
5. हा रोग खरिपात रोपवाटिकेतील रोपावरदेखील येतो. त्यामुळे रोपांची पाने काळी पडून वाळतात नंतर रोप मरतात.
 
👉रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण :
 
1. खरिपातील दमट आणि उबदार हवामानात या रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते.
2. या रोगाची बुरशी पावसाच्या थेंबामार्फत एका झाडावरून दुसर्‍या झाडावर पसरते. तसेच रोपवाटिकेमधून हा रोग मुख्य शेतात पसरतो.
3. पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण आणि सतत झिमझिम पडणारा पाऊस यामुळे रोगाचे प्रमाण वाढते व माना लांब होतात व कांदा काही प्रमाणात तयार झाल्यानंतर रोगाचे प्रमाण वाढले तर पाने वाळतात व कांदा पोसत नाही.
 
 

 
 
3. पांढरीसड (White Rot)
 
या रोगामुळे कांद्याचे 50 ते 60 टक्के नुकसान होते.
बुरशी : स्केलेरोशियम रॉल्फसी (Sclerotium rolfsii)
     

👉लक्षणे :
 
1. ही बुरशी पुनर्लागण केलेल्या रोपाच्या मुळावर वाढते.
2. रोपाची किवा झाडाची पाने जमिनीलगत सडतात व पानांचा वरचा भाग 
पिवळा पडतो.
3. जुनी पाने रोगास प्रथम बळी पडतात.
4. रोगाच्या तीव्रतेमुळे पाने जमिनीवर कोलमडतात.
5. मुळे सडल्यामुळे कांद्याचे झाड सहज उपटुन येते.
6. वाढणार्‍या कांद्याला मुळे राहत नाहीत.
7. कांद्यावर कापसासारखी पांढरी बुरशी वाढते. त्यावर पांढरे दाणे तयार होतात व कांदा सडतो.
8. पांढर्‍या सडीचा प्रादुर्भाव पुनर्लागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही.
9. कांद्याच्या वाढीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर काढणीनंतर कांदा साठवणीत हळूहळू सडतो.
 
👉रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण :
 
1. खरीप तसेच रब्बी हंगामातही या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
2. पाण्याचा निचरा चांगल्या न होणार्‍या शेतात या रोगाची तीव्रता अधिक असते.
3. या रोगाची बुरशी जमिनीत बरीच वर्ष राहू शकते.
 
🌟उपाय :
 
1. मर रोग होऊ नये म्हणून जे उपाय केले जातात त्यामुळे हा रोग टाळता येतो.
2. एकाच शेतात वर्षानुवर्षे कांद्याची लागवड करू नये.
3. कांद्याची तृणधान्यासोबत फेरपालट करावी.
4. खरिपातील लागवड नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीत करावी.
5. उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
6. रोपाची मुळे लागवडीपूर्वी कार्बेन्डाझीम द्रावणात 1 ते 2 मिनिटे बुडवून घ्यावीत. त्यासाठी 20 ग्रॅम कार्बेन्डाझीम 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
 
 

 
 
4. मुळकुज (Fusarium basal rot) 
 
बुरशी : फ्युजॅरियम ऑक्सीस्पोरम (Fusarium oxysporum f.sp. cepae)
 
👉लक्षणे : 
 
1. या रोगामुळे कांद्याची पाने पिवळी पडतात व पिवळेपणा बुडख्याकडे वाढत जातो. नंतर पाने सुकून कुजतात.
2. लागण झालेल्या झाडाची मुळे कुजतात व रोगाटलेले झाड सहज उपटून येते.
3. मुळे काळसर तपकिरी रंगाची होतात व झडून बारीक होतात.
4. रोगाच्या सुरुवातीच्या काळात रोगाची लागण झालेला कांदा आणि चांगला कांदा यात विशेष फरक जाणवत नाही.
5. पाने पिवळी झालेल्या झाडाचा कांदा उभा कापला तर आतील भाग तपकिरी झालेला दिसतो. मुळाजवळ भाग कुजतो.
6. रोगाची लागण झालेले कांदे साठवणीत बुडख्याकडून सडतात.
 
👉रोगास अनुकूल स्थिती/वातावरण :
 
1. अधिक तापमान, अधिक आर्द्रता, पाण्याचा निचरा न होणे इत्यादी कारणांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
2. महाराष्ट्रात खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या रोगाची तीव्रता सर्वाधिक असते.
 
🌟उपाय :
 
1. या रोगाची बुरशी जमिनीत राहते. त्यामुळे पिकाची फेरपालट करणे महत्त्वाचे ठरते.
2. जमिनीची खोल नांगरट करुन उन्हाळ्यात तापू द्यावी.
3. थायरम हे बुरशीनाशक चोळून बी पेरणे (1 किलो बियांसाठी 2 ग्रॅम थायरम हे प्रमाण वापरावे).
 
 

 
5. जांभळा करपा (Purple blotch)
 
जगातील सर्व देशांत जेथे कांदा होतो तेथे या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पिकाचे 50 ते 70 टक्के नुकसान होते.
 

बुरशी :अल्टरनेरिया पोरी(Alternaria porri)
 
👉लक्षणे : 
 
1. पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात.
2. चट्टयाचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे पाने किंवा फुलांच्या दांड्यावर पडतात.
3. अनेक चट्टे एकमेकात मिसळून पाने करपतात व नंतर वाळतात.
4. झाडाच्या माना मऊ पडतात (फुलांचे दांडे मऊ पडल्याने वाकतात किंवा मोडून पडतात).
 
👉रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण :
 
1. जांभळ्या करप्याचे प्रमाण खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात असते. रोपवाटिका तसेच पुनर्लागण झालेल्या पिकावर आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकावरदेखील प्रादुर्भाव होतो.
2. 18 ते 200 सें. तापमान व 80 टक्के आर्द्रता या रोगाच्या बुरशीवाढीस पोषक असते.
3. रब्बी हंगामात जाने.-फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असेल तर या रोगाची तीव्रता अधिक होते.
4. रांगड्या हंगामातील कांद्यावरदेखील या रोगाचा बराच प्रादुर्भाव होतो.
 
🌟उपाय : 
 
1. मॅन्कोझेब (0.3%) 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम (0.2%) 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावे.
2. थायरमसोबत बीजप्रक्रिया करावी.
3. फवारणीसोबत चिकट द्रवाचा वापर करावा.
4. नत्रयुक्त खताचा जास्त आणि उशिरा वापर करू नये.
5. पिकांची फेरपालट करावी.


6. कांद्यावरील तपकिरी करपा (Stemphylium blight)
 

 
बुरशी : स्टेम्फीलीयम व्हॅसिकॅरियम (Stemphyliumvesicarium)
 
👉लक्षणे :
 
1. या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो.
2. पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसू लागतात. चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
3. फुलांच्या दांड्यावर हा रोग असल्यास फुलांचे दांडे मऊ होतात व त्याजागी वाकून मोडतात.
 
👉रोगास प्रतिकूल स्थिती/वातावरण :
 
1. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो.
2. 15 ते 200 सें. तापमान व 80 ते 90 टक्के आर्द्रता यामुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते.
3. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण राहिले तर रोगाचा प्रसार जोरात होतो.
 
 
 
 
        तपकिरी करपा (Stem phylium blight)
 

 
🌟उपाय : 

1. वातावरण उपयुक्त ठरत असल्यामुळे बुरशीनाशके प्रभावीपणे काम करु शकत नाहीत. तरीही पिकाची फेरपालट, बीजप्रक्रिया, रोपे लावताना कार्बेन्डाझीमच्या द्रावणाचा वापर इ. बाबींमुळे रोगाची तीव्रता कमी करता येते.
2. दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.2% कार्बेन्डाझीमची फवारणी करावी. फवारणीमध्ये चिकट द्रवाचा वापर अवश्य करावा. तसेच एका शिवारात सर्व शेतकर्‍यांनी फवारणी एका ठराविक काळात केली तर रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते.
 
अशीच नवनवीन माहिती  मिळवण्यासाठी   आमच्याशी जोडण्यासाठी  खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 
👇


Telegram    - https://t.me/agropradhan



Comments

Popular posts from this blog

BSC Agri 5th sem all course theory and practical notes pdf

  BSC Agri 5th sem all course theory and practical notes pdf              .  Click on below link 👇  AHDS-353-👉  https://t.me/Agribuddi/609 ECON-353👉 https://t.me/Agribuddi/610 BOT-353 👉 https://t.me/Agribuddi/611 ENTO-354👉 https://t.me/Agribuddi/612 GPB-355  👉 https://t.me/Agribuddi/613 HORT-354👉 https://t.me/Agribuddi/614 PATH-354👉 https://t.me/Agribuddi/616 SSAC-353👉 https://t.me/Agribuddi/617 EXTN-355👉 https://t.me/Agribuddi/618 ELE-HORT-355👉 https://t.me/Agribuddi/619 ELE-AGRO-3510👉 https://t.me/Agribuddi/622 Objective and MCQ pdf  AHDS-353-👉 https://t.me/Agribuddi/659 ECON-353 👉 https://t.me/Agribuddi/663 BOT-353 👉 https://t.me/Agribuddi/662 ENTO-354👉 https://t.me/Agribuddi/661 GPB-355  👉 https://t.me/Agribuddi/667 HORT-354👉 https://t.me/Agribuddi/666 PATH-354👉 https://t.me/Agribuddi/664 SSAC-353👉 https://t.me/Agribuddi/665 EXTN-355👉 https://t.me/Agribuddi/660

BSC agri 4th sem all lecture and practical notes

  For download pdf click on below link 👇👇 Plz open link in google chorme and then telegram 🙏 AGRO-246 👉    https://t.me/Agribuddi/364?single   AGRO-247   👉 https://t.me/Agribuddi/368?single AGRO-248 👉  https://t.me/Agribuddi/374?single AHDD-242 👉 https://t.me/Agribuddi/386?single ECON-242👉  https://t.me/Agribuddi/404?single ENTO-243👉 https://t.me/Agribuddi/431?single GPB-243👉 https://t.me/Agribuddi/441?single HORT-243👉 https://t.me/Agribuddi/451?single SSAC-242👉  https://t.me/Agribuddi/458?single ELE-PATH-243 👉 https://t.me/Agribuddi/465

Bsc agri first semister all subject notes and objective pdf

BSC Agri first semister all subject notes and objective pdf             For downloading pdf click on 👇 given link  AGRO -111👉          https://t.me/Agribuddi/478 AGRO-111 All objective  https://t.me/Agribuddi/480 AGRO-112                    https://t.me/Agribuddi/488 Agro-112 objective    https://t.me/Agribuddi/489 HVE-111 lecture  notes  https://t.me/Agribuddi/490 HVE -111 objective  https://t.me/Agribuddi/492 HORTI -111  https://t.me/Agribuddi/494 HORTI -111 objective  https://t.me/Agribuddi/495 DEG-111 lecture notes                                               👉  https://t.me/Agribuddi/482  DEG-111 Object notes                          https://t.me/Agribuddi/481 MIBO-111 notes  https://t.me/Agribuddi/336 EXTN -111notes  https://t.me/Agribuddi/334?single MATH -111 all notes+objective                         👉  https://t.me/Agribuddi/500?singl BIO-111 all notes +objective                         https://t.me/Agribuddi/504?single I st sem all subject manuals 👇👇                 h