Skip to main content

Posts

Showing posts with the label humani

White Grub life cycle and how to control them ओळख हुमणीची

ओळख हुमणीची (White grubs)    नमस्कार शेतकरी बंधुंनो आज आपण खरीप हंगामातील प्रमुख कीड हुमनी तिलाच व्हाईट ग्रब तसेच स्थानिक भाषेत गोगीर असेही म्हणतात आशा पिकास अतिशय नुकसानकारक किडी बद्दल या लेखात माहिती घेणार आहोत. घ्या किडीचा सर्वनाश करावयाचा असेल तर एकात्मिक पद्धतीने तिचे नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. जर तिचे एकात्मिक कीडनियंत्रण केले तरच ती पूर्णपणे संपुष्टात येते अन्यथा जमिनीत सुप्तावस्थेत असणारे नर तसेच मादी पुना पावसाळ्या ऋतू मध्ये मिलन करून त्यांची पुढची पिढी वाढवतात व तिचा प्रादुर्भाव वर्षांनुवर्षे वाढतो. एका वर्षात सुमारे तिची एक पिढी पूर्ण होते.   खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, कांदा, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते .  व एकदा पिकाचे नुकसान सुरुवात झाल्यानंतर हि कीडआटोक्यात आणणे अवघड होते .अनेक रासायनिक औषधे मारून देखील ते आटोक्यात येत नाही तर तिला सुरुवातीपासूनच नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते  यासाठी या किडीचा जीवनक्रम माहिती असणे अतिशय महत्त्वाचे असते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून घेऊन योग्य पद्धतीने   अळी तसेच प्रौढ अवस